नेहमी विचारले जाणारे प्रश्न
१. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कोण कार्य करू शकतो ?
कोणताही भारतीय नागरिक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कार्य करू शकतो. कार्य करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या संघटनेचा ज्या आपण महासंघ म्हणतो त्या महासंघाचा सभासद व्हावेच लागते असे बंधन नाही. प्रत्येकजण कार्य करण्यासाठी स्वतंत्र आहे. पण ज्यांना इच्छा आहे व आवश्यकता वाटते प्रशिक्षण घेऊन आपल्या क्षमता वृद्धीगंत कराव्या वाटतात असे कार्यकर्ते असे नोंदणी करून नोंदणीकृत कार्यकर्ता म्हणून संस्थेबरोबर समाजसेवा करू शकतात.
ज्यांना इतरांची मदत घ्यावी असे वाटते आणि ज्यांना इतरांना मदत मार्गदर्शन करावे वाटते त्यांनी आणि ज्यांना आणि परस्परांना समृद्ध करवयाचे आहे. त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करावे.
२.आपली संघटना रजिस्टर्ड आहे का ?
उत्तर :होय आपला माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही संस्था केंद्रसरकार च्या द कंपनी ॲक्ट २०१३ च्या सेक्शन ८ नुसार नोंदणीकृत अशासकीय संस्था आहे.
आपल्या संस्थेचा रजिस्ट्रेशन क्रमांक U85300MH2022NPL383632 हा आहे.
देशभर जनतेचे हक्क व अधिकार यांचा प्रसार व प्रचार व्हावा व माहितीगार नागरिक तयार व्हावेत म्हणून प्रबोधन व कृति करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे.
३.आपली संघटना मा.अण्णा हजारे पुरस्कृत आहे का ?
उत्तर : आपली संघटना मा.अण्णा हजारे यांना आदरणीय व आदर्श मानते.माहिती अधिकार कायदा मंजूर व्हावा म्हणून मा.अण्णसाहेब हजारे यांनी दिलेला लढा व प्रयत्न या साठी आम्ही त्यांचे ऋणी व कृतज्ञ आहोत.त्यांनी घालून दिलेल्या मार्गपथावरूनच आपण चालत आहोत. पण मा.अण्णा हजारे यांचा आपल्या संस्था व संघटनेशी थेट संबंध नाही.
४.आपली संघटना संविधान व लोकशाही मानते का ?
उत्तर : आपल्या संघटना लोकशाही मानते.भारतीय संविधान कलम १९ (१)(बी ) अन्वये सर्व भारतीय नागरिकांना निशस्त्र व शांततेच्या मार्गाने एकत्र येणाचा दिलेला अधिकार व कलम १९ (१)(सी ) अन्वये निशस्त्र व अंहिसंक पद्धतीने एकत्र येऊन शासन व प्रशासन यांच्यावर सत्याग्रहांच्या मार्गाने मन व मत परिवर्तन करून कार्य करून घेणे यावर संघटना विस्वास ठेवते. आपली संघटना भारतीय संविधानाला प्रमाण मानून कार्य करते.
५. नोंदणीकृत कार्यकर्ता कसे बनता येते ?
वेळोवेळी ठरविले जाईल असे किमान सेवा व प्रशिक्षण शुल्क भरून कोणीही सज्ञान भारतीय नागरिक संस्थेचा स्वंयसेवी कार्यकर्ता (Volunteer Activist) बनू शकतो.त्याला संघटनेकडून मार्गदर्शन, प्रशिक्षण व जागरूक नागरिक बनण्यासाठी त्याच्या क्षमता विकसीत करता येतात. व शासन व प्रशासन पारदर्शक बनावे व गुड गर्व्हनर्स चालावे म्हणून सामाजिक योगदान देता येते.संस्थेशी जोडून घेऊन समाजसेवा करता येते.