लोकशाही ही सर्वांत सुंदर व सभ्य राजकीय प्रणाली असते. भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे.ही आमच्यासाठी अभिमानस्पद बाब आहे.
मुलतः आमच्या देशातील नागरिक अतिशय साधे सरळ व नैसर्गिक मानवीय वृत्तीचे व बंधूभाव जोपासणारे आहेत. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.
आमची संस्कृती,आमची जीवनशैली,आमची एैतिहासिक परंपरा व आमची भूसंपदा ही आमच्या साठी मोठी अनुकूल बाब आहे.
पण ........
जरी आमची लोकशाही सर्वांत मोठी असली तरी तिच्यात अनेक उणिवा आहेत.दोष आहेत.
इथं काही मुळ प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
मुळात येथील नागरिकांचा लोकशाही शासनप्रणाली मध्ये सहभाग फार कमी आहे.
कायद्याच्या राज्याविषयीची व्यक्तीनिहाय समज पातळी व्यापक व उंच नाही आहे.
जे कायदा बनवितात तेच मुळात कायद्याचं पालन करीत नाहीत.
लॉ मेकर्स हेच मुळात लॉ फोलोअर्स नाही आहेत.हे खूपच गंभीर आहे.
तात्काळ त्वरीत न्याय मिळण्याची यंत्रणा व संरचना उभी करण्यात आम्ही कमी पडलो आहोत.
न्याय यंत्रणेकडून न्यायाला खूप विलंब होतो.असं होणं म्हणजे न्याय नाकारणंच होय.
जेव्हा अन्याय करणाऱ्याला त्वरीत व निश्चित शिक्षा होत नाही तेव्हा ते एक प्रकारचं धूसर अराजकच असतं.
याचा परिणाम म्हणून शासन, प्रशासन, न्याय या तिन्ही व्यवस्था कमालीच्या भ्रष्ट व बेजबाबदार बनल्या आहेत.
भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, स्वार्थ यांना समाजात मान्यता व प्रतिष्ठा मिळालेली आहे.
सामान्य माणसांला कसलेही घटनादत्त अधिकार पूर्णपणे व समाधानकारपणे मिळत नाहीत.
सामान्य माणसे ही कायदा प्रमाण मानून घटनादत्त कर्त्यव्य करीत नाहीत.
याला काही सन्माननीय अपवाद आहेत.पण अपवादानं तर नियम सिद्ध होतो.
आमचं स्वप्न :
कायद्याचं राज्य (The Rule of law) पुरेसं नाही. या देशात न्यायाचं राज्य (The state of justice) आलं पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे.
अधिकार, जबाबदारी व कर्त्यव्य या त्रिमीतीमध्ये राजकीय,सामाजिक अर्थिक व शैक्षणिक बाजूने प्रत्येक नागरिक माहितीगार, समजदार व जबाबदार बनला पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे.
भारतांच संविधान आणि संविधांनाचा मूळ प्राण हीच आमच्या सह अस्तित्वाची व सह जीवनांची मूळ प्रेरणा बनली पाहिजे.
हे आमचं स्वप्नं आहे.
भारत एक बलशाली व जगाच नेतृत्व करणारा समर्थ देश झाला पाहिजे.
हे आमचं स्वप्नं आहे.
: आमचा कृतीसंकल्प : वरील स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचोटीने प्रमाणिकपणे चिकाटीने लोकशाही व संविधानिक मार्गाचा अवलंब करून अविरत प्रयत्न करणे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ......... पुढील दहा गुण असणारा उत्तम नागरिक व चांगला माणूस घडवणं या साठी निरंतर प्रयत्न करत राहणं हाच आमचा कृतिकार्यकम आहे.
१. नागरिक म्हणजे : समाजच्या हितात स्वतःच हित व स्वतःच्या हितात समाजांच हित पाहणारा व कायम सक्रीय असणारा मनुष्य.
२.नागरिक म्हणजे : कोणतेही सार्वजनिक काम वा जबाबदारी द्या. ती अतिशय प्रामाणिकपणे व विस्वासार्हतने पूर्ण पार पाडणारा अफलातून व विकसनशील मनुष्य.
३. नागरिक म्हणजे : स्वतः स्वयंस्फूतपणे देशातील कायदे व नियम पाळणारा व इतरांनी ते पाळले पाहिजेत असा आग्रह धरणारा व त्यासाठी किंमत मोजणारा कृतिशील मनुष्य.
४.नागरिक म्हणजे : स्वतःच्या अधिकाराविषयी जागरूक असणारा व इतरांच्या अधिकारांची जपवणूक झाली पाहिजे. कोणाच्याही अधिकारांचं हनन नाही झालं पाहिजे, असं मत असणारा व तसंच वागणारा सावध मनुष्य
५.नागरिक म्हणजे : कायदे , नियम, मूल्य, तत्व आणि निती यांची जाणीव पूर्वक जपवणूक व पालन करणारां उन्नत मनुष्य.
६.नागरिक म्हणजे : आपला सन्मान, आपले जिवित व आपली मालमत्ता यांचे रक्षण करताना इतरांचा सन्मान इतरांचे जिवीत व इतरांची मालमत्ता यांना तसूभरही हानी होऊ नये याची काळजी घेणारा चांगला मनुष्य.
७.नागरिक म्हणजे :स्वतःचे विचार, स्वतःचे मत व स्वतःची वागणूक यात एकजिनसीपणा व समानता असावी म्हणून पराकोटीचा दक्ष असणारा मनुष्य.
८.नागरिक म्हणजे :अधिकारांचे अतिमतः सरंक्षण फक्त संर्वांगिण कर्त्यव्यातूनच होते. यावर संपूर्ण विस्वास असणारा कर्त्यव्य कठोर मनुष्य. प्रथम कर्त्यव्य मग अधिकार हे मूल्य माननारा माणूस.
९. नागरिक म्हणजे : घरात, नातेवाईकांत, शेजाऱ्यांशी व गल्लीत वागताना पूर्ण लोकशाही व पूर्ण न्याय पूर्ण सत्य या तत्वांनुसार जगणारा मनुष्य.
१०.नागरिक म्हणजे : जीवजंतू,प्राणीमात्र, वृक्षराजी व पर्यावरण यांचे रक्षण झाले पाहिजे म्हणून स्वतःचे योगदान देणारा निर्सगस्नेही मनुष्य.
हे सगळं करण्यासाठी खूप दुरचा व खूप मोठा प्रवास होणं आवश्यक आहे. पण कोणताही प्रवास हा पहिल्या पावलांन सुरू होतो. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ हे पाहिलं पाऊल आहे. या माध्यमातून अतिशय प्रमाणिक, अतिशय क्रियाशील, अतिशय त्यागी, अतिशय अभ्यासू व अतिशय कृतीशील अशी नेतृत्वाची फळी तयार करणे हे ध्येय आहे.
:कायदेशीर मान्यता: :
सेक्शन ८ (१ )कंपनी नोंदणी कायदा २०१३ नुसार सदर संस्था नोंदणी केलेली आहे
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ) ऑफिस ०३ हार्मोनी बिल्डिंग प्लॉट न ०६ सेक्टर ०१ खांदा कॉलोनी नवीन पनवेल ४१०२०६ संपर्क : मो. ९२२३५१६९२० e-mail : [email protected]
माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ ) ची नोंदणी प्रमाणपत्र
माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ ) विषयीची कायदेशीर माहिती